शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 26 मे 2020 (07:28 IST)

करोनाबाधितांच्या संख्येत धारावी, माहिम, दादरमध्ये वाढ

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५८३ च्या वर पोहोचली आहे.
 
त्या पाठोपाठ माहिम ३४ आणि दादरमध्ये २० नव्या रुग्णांची भर झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
 
धारावीत काल ४२ नवे रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णसंख्या १५८३वर पोहोचली आहे. धारावीत आज बलिगा नगर, साथी हौसिंग सोसायटी, होळी मैदान, पंचशील सोसायटी, मंगल कैलाश बिल्डिंग, शास्त्रीनगर, भीम नगर, म्युनिसिपल चाळ, मेघवाडी, शांती नगर, धारावी क्रॉस रोड, पीएमजीपी कॉलनी, संघम गल्ली, ढोरवाडा, प्रेम मिलन बिल्डिंग, प्रगती नगर, शेठवाडी चाळ, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, सोशल नगर, वैभव सोसायटी, कल्पतरू बिल्डिंग, सिता निवास चाळ, राजीव गांधी नगर, कोल्हापूर लेन आणि धारावी मेन रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर शाहू नगर आणि रजीब अली चाळ येथे प्रत्येकी दोन, कुंभारवाडा येथे ५ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले आहेत.